मी भाजपचा राजीनामा का देतोय? जे पाहिले, जे अनुभवले, ते सहनशक्तीच्या बाहेरचे होते, मनाला न पटणारे होते...
२०१३ मध्ये मोदींमध्ये मला देशाच्या उज्ज्वल भविष्याचा एक आशेचा किरण दिसत होता. मी त्यांच्या विकासाच्या मॉडेलला भुललो होतो. आज विकासाचे ते मॉडेलही गायब झालेले आहे आणि आशेचा तो किरणही गायब झालेला आहे. मोदी-शहा सरकारच्या रचनात्मक कामांपेक्षा त्यांच्या विघातक कामांचीच यादी मला खूप मोठी दिसत आहे. लक्षात ठेवा, ‘अपप्रचाराला बळी पडणे’ आणि ‘एखाद्याची आंधळी भक्ती करणे’ याच्याएवढे वाईट काम दुसरे कोणतेही नसेल.......